जनआक्रोश मोर्चामुळे एमआयएम ला उकळ्या ?

गेल्या दोन महिन्यात मुंबईमध्ये दोन मोठे मोर्चा निघाली पहिला मोर्चा १७ डिसेंबर २०२२ रोजी म्हणजे गेल्या वर्षी महाविकास आघाडीने काढलेला मोर्चा आणि 29 जानेवारी 2023 ला सकल हिंदू समाजाने काढलेला हिंदू जनआक्रोश मोर्चा सकल हिंदू समाजाने काढलेल्या मोर्चाची तुलना महाविकास आघाडीने काढलेल्या मोर्चाशी केली तर त्यांचा मोर्चा सपशेल अपयशी ठरलेला दिसला आणि त्यामुळेच माविकास आघाडीच्या नेत्यांची सकल हिंदू समाजाने काढलेल्या मोर्चामुळे मळमळ वाढली आहे. एका बाजूलाही मळमळ वाढली असल्याने एमआयएम चे नेते मात्र नक्कीच खुश असतील त्यांना आनंदाच्या उकळ्या फुटत असतील.

17 डिसेंबर रोजी जो मोर्चा निघाला होता तो महाविकास आघाडीने प्रतिष्ठेचा केला होता या मोर्चाची रणनीती ठरवण्यासाठी अजित पवार यांच्या निवासस्थानी तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांची बैठक देखील झाली होती या बैठकीत राज्यभरातून या मोर्चासाठी लोककसे येतील यावर चर्चा झाली. या मोर्चासाठी प्रचंड पोस्टर बाजी करण्यात आली तसेच प्रचंड पैसा देखील खर्च करण्यात आला प्रत्यक्षात जेव्हा मोर्चा निघाला तेव्हा मोर्चामध्ये उपस्थित असलेली संख्या अत्यंत कमी होती त्या तुलनेत हिंदु जनआक्रोश मोर्चाचा विचार केला तर या मोर्चामध्ये फक्त दोन पक्षाचे लोक जमा झाले होते भारतीय जनता पार्टी आणि बाळासाहेबांची शिवसेनातसेच काही हिंदुत्ववादी संस्थांचा या मोर्चामध्ये सहभाग होता.

मोर्चाचे आयोजक सकल हिंदू समाज असल्याने कुठल्याही प्रकारची पोस्टरबाजी करण्यात आली नव्हती कोणत्याही पक्षाचे किंवा संस्थेचे नाव ही या मोर्चाला दिले नव्हते तरी देखील हा मोर्चा यशस्वी झाला या मोर्चावर ताकद फक्त समाज माध्यमांवर लावण्यात आली होती आणि फारशी चर्चा न करता आयोजित केलेल्या या मोर्चाचे यश महाविकास आघाडीच्या मोर्चा पेक्षा खूप मोठे होते. कारण महाविकास आघाडीच्या मोर्चामध्ये राज्यभरातून लोक आले होते आणि मुंबईमधील हिंदू जनआक्रोश मोर्चा निघण्यापूर्वी राज्यात अन्य ठिकाणी देखील असे मोर्चे काढण्यात आले होते. शिवाजी पार्क वरून शिवसेना भवन च्या मार्गावरून हा मोर्चा जेव्हा पुढे गेला तेव्हा प्रचंड गर्दी झालेली दिसत होती त्यामुळे ठाकरे गटातील किंवा महाविकास आघाडीमधील नेत्यांना मळमळ होणं अत्यंत स्वाभाविक होतं ही मळमळ सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी सामनाच्या माध्यमातून व्यक्त देखील केली. हिंदूंच्या हितासाठी निघालेल्या या मोर्चामध्ये लव जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायदा करण्याची मागणी करण्यात आली होती त्यामुळे महाविकास आघाडीतील पक्ष यात सहभागी झाले नाही हिंदू समाजाची अपेक्षा ठाकरे गटाकडून होती जर सोबत नाही तर किमान विरोध तरी नको अशी हिंदू समाजाची मागणी होती पण प्रत्यक्षात तसे झाले नाही हेच नेमकं कारण आहे एमआयएम ला उकळ्या फुटण्याचे.

काही दिवसांपूर्वी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडी सोबत येण्याची इच्छा व्यक्त केली होती ह्या आधी एमआयएम ची वंचित बहुजन आघाडी सोबत युती होती वंचितने आता ठाकरे गटाशी युती केली आहे. त्यामुळेच एमआयएम जर महाविकास आघाडी सोबत आलं तर ठाकरे गट त्याला विरोध करू शकणार नाही तसेच सपाचे नेते अबू आझमी यांच्याशी महाविकास आघाडीने जुळून घेतले होते त्यामुळे एम आय एम ला सोबत घेण्यास त्यांना काही अडचण येणार नाही सध्याची राजकीय समीकरण पाहता ती देखील एक भूमिका आहे त्यामुळे आज किंवा उद्या एमआयएम च्या आघाडी सोबत युती होईल यात शंका नाही हिंदू जन आक्रोश मोर्चामध्ये ठाकरे गटाने समावेश न घेतल्याने ही बाब स्पष्ट होताना दिसत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या पक्षांची भूमिका देखील एमआयएम बाबत मवाळच असेल या मोर्चावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की मला लव माहिती आणि जिहाद देखील माहिती आहे पण लव जिहाद काय असतं हे मला माहित नाही त्यांची ही प्रतिक्रिया स्वाभाविक आहे कारण त्यांची प्रतिक्रिया कुठेतरी एमआयएमच्या भूमिकेशी अनुकूलच असणार त्यामुळे हे दोन पक्ष एमआयएम ला सोबत घेण्यास तयार असणार त्यामुळे आज ना उद्या यांची युती होईल परंतु या मोर्चाच्या निमित्ताने राज्यात हिंदू समाजाने आपली ताकद दाखवली आहे.