राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वीकारला आहे. सध्या झारखंडचे राज्यपाल असलेले रमेश बैस नवे राज्यपाल होणार आहेत. काही दिवसांपूर्वी कोश्यारी यांनीमहाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची जबाबदारी अधिक काळ सांभाळण्यास असमर्थता दर्शविली होती. तशी विनंती त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मुंबई दौऱ्यात केल्याची माहिती त्यांनी स्वतःहून दिली होती.राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशातील १३ राज्यपाल आणि उपराज्यपाल यांची बदली केली आहे. त्यामध्ये महाराष्ट्राच्या राज्यपालांचाही समावेश आहे.
महाराष्ट्र विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होणार आहे. राज्यपाल अभिभाषण करत असतात यावेळी विरोधकांकडून राज्यपालांचा विरोध होण्याची दाट शक्यता होती. दोन दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे कोल्हापूरमधील नेते संजय पवार यांनी राज्यपालांविरोधात आक्रमक आंदोलन केले होते मविआचे नेते सतत राज्यपाल हटाव मोहीम राबवत होते.
