उद्धव ठाकरे यांचे आता उत्तर भारतीय व्होटबँकेवर लक्ष ; गोरेगावात संवाद साधणार

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेना अस्थिर झाली. शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेपक्षाची ताकद वाढवण्यासाठी धडपड करीत आहेत. आधी गुजराती आणि जैन समाजाशी संवाद साधल्यानंतर आता उद्धव ठाकरे यांनी उत्तर भारतीय व्होटबँकेच्या दिशेने मोर्चा वळवला आहे. उद्धव ठाकरे आज गोरेगावात उत्तर भारतीयांशी संवाद साधणार आहेत. त्यासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी तयारीला सुरुवात केली आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर भारतीयांना आपल्याकडे आकर्षित करण्याची ठाकरे गटाने रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून उत्तर भारतीय समाजाने आयोजित केलेल्या संपर्क अभियानात उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत.गोरेगावच्या राम मंदिर रोडवरील नाहर निकेतन येथे सायंकाळी 5 वाजता उत्तर भारतीयांचा कार्यक्रम होणार आहे.

जैन धर्मीय व्होटबँकेप्रमाणेच उद्धव ठाकरे यांनी उत्तर भारतीय व्हॉटबँकेवरही लक्ष वेधलं आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर भारतीयांना आपल्याकडे आकर्षित करण्याची ठाकरे गटाने व्यूहरचना आखली आहे. त्याचाच एक भाग म्हणून उत्तर भारतीय समाजाने आयोजित केलेल्या संपर्क अभियानात उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत.गोरेगावच्या राम मंदिर रोडवरील नाहर निकेतन येथे सायंकाळी 5 वाजता उत्तर भारतीयांचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला स्वत: उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत. या परिसरात उत्तर भारतीयांची लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे या कार्यक्रमाला उपस्थित राहून काय मार्गदर्शन करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

गेल्या 15 दिवसांत उद्धव ठाकरेंनी जैन धर्मियांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून धर्मगुरुंचे आशीर्वाद घेतले होते. मुंबईत उत्तर भारतीय, जैन आणि गुजराती समाजाचे लाखो मतदार आहेत. त्यामुळे हे मतदार आपल्याकडे खेचण्यासाठी ठाकरे गटाने प्रयत्न सुरू केले आहेत.