माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मदतीचे आश्वासन देत होते. मात्र सरकार आल्यानंतर मागण्यांकडे पाठ फिरवली.महाविकास आघाडी सरकारच्या काळात शेतकऱ्यांना मासिक २५१ कोटी रुपये मदत मिळत होती. मात्र सत्तांतरानंतर अवघ्या सात महिन्यांत सरासरी एक हजार २३९ कोटी याप्रमाणे सहा हजार १९५ कोटींची मदत शेतकऱ्यांना केली असा दावा कृषीविषयक ठरावात करण्यात आला.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात शेतकऱ्यांना मासिक २५१ कोटी रुपये मदत मिळत होती. मात्र सत्तांतरानंतर अवघ्या सात महिन्यांत सरासरी एक हजार २३९ कोटी याप्रमाणे सहा हजार १९५ कोटींची मदत शेतकऱ्यांना केल्याचा दावा कृषीविषयक ठरावात करण्यात आला.भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी कृषी विषयाचा ठराव मांडला. या संदर्भात माजी कृषिमंत्री अनिल बोंडे यांनी सांगितले की महाविकास आघाडी सरकारने अर्थसंकल्पात कर्जमाफीची घोषणा केली मात्र प्रत्यक्षात घोषणा उतरली नाही. शिंदे – फडणीस सरकार स्थापन झाल्यानंतर सहा महिन्यांत शेतकऱ्यांना साडेसात हजार कोटी रुपयांतून अधिक मदत मिळाली.
