एमसी स्टॅन ठरला ‘बिग बॉस 16’चा विजेता

बिग बॉस १६’ला अखेर त्याचा विजेता मिळाला. गेल्या १९ आठवड्यांपासून सुरू असलेल्या या कार्यक्रमच आज ग्रँड फिनाले पार पडला. या ग्रँड फिनाले मध्ये एमसी स्टॅनने बिग बॉसच्या सुंदर ट्रॉफीवर आपले नाव कोरले.बिग बॉस 16’च्या टॉप फाईव्हमध्ये शिव ठाकरे, एमसी स्टॅन, प्रियांका चहर चौधरी, अर्चना गौतम आणि शालिन भनोत यांच्यात लढत होती. शालिन आणि अर्चना यांना अनुक्रमे पाचव्या आणि चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे. प्रियांका चौधरीचा प्रवास तिसऱ्या क्रमांकावर येऊन थांबला.

एमसी स्टॅनने ‘बिग बॉस 16’च्या ट्रॉफीवर नाव कोरल्यानंतर खास पोस्ट शेअर करत चाहत्यांचे आभार मानले आहेत. एमसी स्टॅनने भाईजान सलमान खानसोबतचा फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करत त्याने लिहिलं आहे,”आम्ही इतिहास रचला आहे. नॅशनल टेलिव्हिजनवर खरं वागण्याचा आणि राहण्याचा मी प्रयत्न केला आहे. ‘बिग बॉस 16’चा विजेता होण्याचं आईचं स्वप्न पूर्ण केलं आहे. माझ्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाचा माझ्या यशात मोलाचा वाटा आहे. स्टॅन तुमचाच आहे”. बिग बॉसच्या विजेत्याला म्हणजेच एमसी स्टॅन बिग बॉसची सुंदर ट्रॉफी, 31 लाख 28 हजार रुपये, कार बक्षीस मिळाली. ट्रॉफी मिळताच स्टॅनने सलमान खानच्या सांगण्यावरून रॅप परफॉर्म आणि जाता जाता सर्वांचे आभार मानले.