कर्नाटक विधानसभा निवडणुकांमध्ये सावरकरद्वेषाचे राजकारण करण्याचा डाव काॅंग्रेसने आखला आहे. हिजाब प्रकरणावरून सुरू झालेल्या राजकारणाचा फायदा मिळविण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. काॅंग्रेसचे माजी मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनी भाजप ब्रिटिशांची माफी मागणाऱ्या सावरकरांना आदर्श मानतो असे म्हटले आहे.
विजयपूर मध्ये पत्रकारांशी बोलताना सिद्धारमैया म्हणाले की भाजपने राणी चन्नम्मा कित्तूरचा कधी सन्मान केला नाही. राणी चन्नम्मा ईस्ट इंडिया कंपनी विरुद्ध त्वेषाने लढली होती. पण भाजप राणीचा सन्मान करण्यापेक्षा महात्मा गांधींना मारणाऱ्या गोडसेची पूजा करतो आणि ब्रिटिशांची माफी मागणाऱ्या सावरकरांना आदर्श मानतो. सावरकरांच्या विचारातूनच भाजप समाजात हिंदू – मुसलमानांमध्ये द्वेष पसरवतो मी स्वतः हिंदू धर्म विरोधी नाही. पण सावरकरांनी आणि भाजपने स्वीकारलेल्या हिंदुत्वाच्या विरोधात आहे असे वक्तव्य सिद्धारमैया यांनी केले आहे. सिद्धरामय्या यांच्या टीकेला उत्तर देताना मुख्यमंत्री बसवराज बाेम्मई म्हणाले यां सिद्धरामय्या यांचा काँग्रेस पक्ष नेहमीच देशातल्या स्वातंत्र्यवीरांचा अपमान करत असतो त्यांच्यात भेदभाव निर्माण करतो. हिंदू – मुसलमान भेदभाव करूनच त्यांनी देशाच्या फाळणीला मान्यता दिली.
