अजित पवारांचे कान काेणी टाेचले? ठाकरेंवर स्तुतीसुमने तर पटाेलेंशी कानगाेष्टी

सत्यजित तांबे प्रकरणावरून काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले यांच्यावर टीका तर सत्तांतरास उध्दव ठाकरे यांना निष्क्रियतेवरून डिवचणाऱ्या अजित पवारांनी अचानक भूमिका बदलली आहे. उध्दव ठाकरेंची सत्ता घालवणाऱ्यांचा बदला घ्या असे म्हणत त्यांनी स्तुतीसुमने उधळली. नाना पटाेले यांच्याशी कानगाेष्टी केल्या त्यामुळे अजित पवारांचे कान काेणी टाेचले असा सवाल केला जात आहे.

चिंचवड मतदारसंघ पाेटनिवडणुकीसाठी अजित पवार यांनी आदित्य ठाकरे आणि नाना पटाेले यांच्यासाेबत सभा घेतली. यावेळी बाेलताना उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदावरून पायऊतार व्हावे लागले त्याचा आपल्याला बदला घ्यायचा आहे असे आवाहन त्यांनी केले. दहा दिवसांपूर्वीच सत्तांतराबाबत गाैप्यस्फाेट करताना उध्दव ठाकरे यांना बंडखाेरीची माहिती दिली हाेती असा दावा केला होता. मुभा असल्यासारखे त्यांनीच आमदारांना जाऊ दिले असा आरापे त्यांनी उध्दव ठाकरे यांच्यावर केला हाेता. मात्र आज त्यांनी ठाकरे विषयी बोलताना भाषा बदल्याचे दिसून आले

नाशिक पदवीधर मतदारसंघात सत्यजीत तांबे उमेदवारी प्रकरणात नाना पटाेले यांनीच घाेळ घातला असा आराेप करत अजित पवारांनी डिवचले हाेते. मात्र आता त्यांनी नाना पटाेले यांच्याशी कानगाेष्टी केल्या.अजित पवार यांच्या वक्तव्यांमुळे महाविकास आघाडीमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले हाेते. त्यावरून पक्षनेतृत्वाने त्यांचे कान टाेचल्याची चर्चा आहे त्यामुळेच पवारांच्या भूमिकेत अचानक बदल झाला आहे.