हटाव लुंगी – बजाव पुंगी ते तामीळनाडूच्या मुख्यमंत्र्यांशी चुंबाचुंबी

मराठी भाषिकांना संधी मिळावी यासाठी शिवसेनेने 1960 च्या दशकात हटाव लुंगी – बजाव पुंगी आंदाेलन सुरू केले हाेते. मुंबईतील दक्षिण भारतीयांच्या वर्चस्वाला विरोध करण्यासाठी हे आंदाेलन सुरू झाले हाेते. मात्र बाळासाहेब ठाकरे यांची तिसरी पिढी आता दक्षिण भारतीय मतांसाठी तामीळनाडूच्या मुख्यमंत्र्यांशी चुंबाचुंबी करत असल्याने मराठी मतदारांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे.

शिवसेनेच्या ( ठाकरे गट ) युवासेनेचे प्रमुख आणि उध्दव ठाकरे यांचे पुत्र आदित्य यांनी नुकतीच तामीळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलीन यांची भेट घेतली. मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तामीळ मतांवर डाेळा ठेवूनच ही भेट घेण्यात आल्याचे म्हटले जात आहे. मात्र शिवसेनेचा कट्टर कार्यकर्त्यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी नेहमी ज्या गाेष्टींना विराेध केला त्याच उध्दव – आदित्य हे पिता-पुत्र करत असल्याचे म्हटले जात आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी वैयक्तिक पातळीवर मैत्रीचे संबंधी असूनही शरद पवार यांच्या राजकारणावर नेहमीच टीका केली. म्हमद्या, मैद्याचे पाेते असे म्हणून सार्वजनिक पातळीवर शरद पवार यांच्या मुस्लिम अनुनयाच्या राजकारणाला विराेध केला. मात्र उध्दव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे शिल्पकार असलेली शिवसेना- भारतीय जनता पक्ष युती ताेडून शरद पवार यांच्याच राष्ट्रवादी काॅंग्रेसबराेबर जाऊन सत्ता मिळविली.

बाळासाहेब ठाकरे यांच्या दक्षिण भारतीयांबाबतच्या भूमिकेवरही यू टर्न घेतला. मुंबईत मराठी माणसाला दुय्यम स्थान मिळत असल्यानेच बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना केली. मराठी माणसांना पाठिंबा देण्यासाठी दाक्षिणात्य लोकांविरोधात हटाव लुंगी, बजाव पुंगी ही मोहीम शिवसेनेने सुरू केली. ‘मुंबई आमची नाही कुणाच्या बापाची’ हे समोरच्याला ठणकावून सांगण्याची हिंमतही मराठी माणसाला बाळासाहेबांच्या शिवसेनेनेच दिली. त्यामुळे मुंबईतील मराठी माणसाला शिवसेनाच न्याय देऊ शकते असे अनेकांना वाटते. परंतु मतांच्या राजकारणात दक्षिण भारतीयांशी सलगी उत्तर भारतीयांच्या मेळाव्यांना हजेरी लावून शिवसेनेच्या ( ठाकरे गट ) मुळ हेतूलाच हरताळ फासण्याचे काम ठाकरे पित्र- पुत्र करत असल्याने शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे.