उपमुख्यमंत्र्यांचा महाराष्ट्राचा महासंकल्प 2028 पर्यंत महाराष्ट्र एक ट्रिलीयन डाॅलरची अर्थव्यवस्था

महाराष्ट्राचा महासंकल्प’ या टीव्ही नाईन वृत्तवाहिनीने आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2028 पर्यंत महाराष्ट्राला एक ट्रिलीयन डाॅलरची अर्थव्यवस्था बनिवण्याचा संकल्प व्यक्त केला. फडणवीस यांनी या कार्यक्रमात मांडलेले महाराष्ट्राचे व्हिजन:

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देशाला फाईव्ह ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी बनवण्याचे व्हिजन आहे. हे करायचे असेल तर महाराष्ट्राची अर्थव्यवस्था वन ट्रिलियन डॉलरची करावी लागेल. या दृष्टीने अर्थव्यवस्थेच्या सेवा, उद्योग आणि उद्योग या तिन्ही क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक, सुधारणा, तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधा यांच्या आधारे वेगवान विकास करण्याचा प्रयत्न आपण करतो आहोत.
  • समृद्धी महामार्गाचा दुसरा टप्पा लवकरच पूर्ण होईल. महाराष्ट्रातल्या १४ जिल्ह्यांना या माध्यमातून थेट जेएनपीटी बंदराशी आपण जोडतो आहोत. देशातला साठ ते सत्तर टक्के कंटेनर ट्रॅफिक हा जेएनपीटी पोर्टमधून होतो. या पोर्टलेड डेव्हलपमेंटचा फायदा मुंबई, पुण्याच्या पलीकडे महाराष्ट्राच्या सगळ्या भागात गेला पाहिजे.
  • नागपूर ते गोवा हा महामार्ग असेल ज्यामुळे मराठवाड्यातले ५ ते ७ जिल्हे या इकॉनॉमिक कॉरिडॉरचा भाग होतील. यामुळे उद्योग आणि शेती क्षेत्राचा फायदा होईल. समृद्धी महामार्ग गडचिरोलीपर्यंत नेत आहोत. या ठिकाणी आत्ताच वीस ते पंचवीस हजार कोटींची गुंतवणूक येत आहे. नेक्स्ट स्टील हब ऑफ इंडिया हा गडचिरोली होणार आहे.
  • -विरार-अलिबाग कॉरिडॉर तयार करतो आहोत, ज्यामध्ये सहा लाख कोटी रुपयांची व्हॅल्यू आपण तयार करणार आहोत. पुण्याच्या रिंगरोडच्या माध्यमातून सव्वादोन लाख कोटी रुपयांची व्हॅल्यू तयार करतो आहोत. हे सगळे अ‍ॅक्सेस कंट्रोल्ड कॉरिडॉर तयार करतो आहोत.
  • संभाजीनगर-औरंगाबाद येथे ऑरिक सिटी तयार करतो आहोत. ही पहिली इंटिग्रेटेड स्मार्ट इंडस्ट्रीयल सिटी तयार केली. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आणतो आहोत.
  • -आपले सरकार आल्यापासून केवळ सहा महिन्यात जवळजवळ एक लाख कोटी रुपयांच्या गुंतवणूक प्रस्तांवाना मान्यता दिली. त्याचे काम आपण सुरू करतो आहोत.
  • महाराष्ट्र इनोव्हेशनचे कॅपिटल आहे. स्टार्ट – अपचे हब आहे. देशातल्या ८० हजार स्टार्ट-अप पैकी १५ हजार स्टार्ट-अप एकट्या महाराष्ट्रात आहेत. देशातल्या १०० पैकी २५ यूनिकॉर्नस् एकट्या महाराष्ट्रात आहेत. इनोव्हेशनच्या माध्यमातून नवी इकोसिस्टम तयार करून मोठ्या प्रमाणात रोजगारांची निर्मिती आपण करतो आहोत.
  • इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये गुंतवणूक केल्यानंतर ३२ उद्योगांना त्याचा फायदा होत असल्याने त्यातून मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होत आहे.