उद्धव ठाकरेंचा स्वार्थ आणि पुत्रप्रेम युती तोडण्यास जबाबदार – चंद्रशेखर बावनकुळे

बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्व टिकवण्यासाठी प्रयत्न केले मात्र उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व तोडून पाठीत खंजीर खुपसला. आता मात्र त्यांना चूक लक्षात आली आहे, माझी चूक झाली हे उशीरा सुचलेले शहाणपण आहे, पण आता बोलता येत नसल्याची परिस्थिती आहे.अशा शब्दांमध्ये भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपुरात बोलताना उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

काँग्रेसची विचारधारा स्विकारुन भाजपाच्या पाठीत खंजीर खुपसुन युती तोडली. त्यामुळे युती तोडण्याला जवाबदार हे फक्त उध्दव ठाकरे यांचा स्वार्थ आणि पुत्र प्रेम आहे. सावरकरांचा अपमान होत असताना सरकार जाईल म्हणून तोंडाला पट्टी बांधली. आता हिंदुत्ववावर बोलण्याचा अधिकार उद्धव ठाकरे यांना नाही. असंही बावनकुळे म्हणाले.

उद्धव ठाकरे यांच्या जवळचे 50 आमदार निघून गेले राज्यपाल यांनी संविधानिक पद्धतीन नियमात राहून त्याचं पालन केले. पण महविकास आघाडीचे सरकार गेल्यानं त्यांना दुःख झालं आहे, नियम बाह्य काम राज्यपाल यांनी होऊ दिले नाही अतिशय उत्तम काम केले, शिवनेरी किल्यावर जाऊन दर्शन घेतलं विकास कामाला छत्रपती शिवरायांचा उल्लेख केला शिवाजी महाराजांची प्रेरणा मानून राज्यपाल यांनी काम केले एका वक्तव्यामुळे राज्यपालांना आरोपीच्या पिंजऱ्यात ठेवता येत नाही राज्यपाल महाराष्ट्राला ऊर्जा देणारे होते.