शरद पवार ‘अडाणी’ चे काैतुक करतात ; मग शेतकऱ्यांचे का नाही करत? – सदाभाऊ खोत

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकात शेतकऱ्यांचं कौतुक नाही. मात्र गौतम अडाणीचं कौतुक केले आहे. शरद पवार म्हणजे ओसाड गावचे पाटील आहेत. अशा ओसाड गावच्या पाटलांच्या बोलण्याला अर्थ नसतो अशी टीका माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी केली.सदाभाऊ खोत म्हणाले की, आज ही सर्व मंडळी ‘अडाणी’ च्या नावाने गळे काढत आहेत. त्यांना मी आठवण करून देऊ इच्छितो की आपण जे पुस्तक लिहिले आहे. त्यात तुम्ही तर या अडाणीचे कौतुक केले आहे. ते कसे तुमच्या पुस्तकात तुम्ही शेतकऱ्याच कौतुक का केले नाही. मग अडाणीचे कौतुक कसे केले आहे मग आता अडाणीच्या नावाने गळे का काढत आहात. यावेळी सदाभाऊ खोत यांनी अजित पवार यांच्यावर देखील टीका केली आहे.

संपूर्ण राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या प्रतीक्षेत आहे. विरोधकांकडूनही वारंवार विस्ताराबाबत बडे दावे करण्यात येत आहेत. अशातच माजी कृषी राज्य मंत्री सदाभाऊ खोत यांनी मोठं वक्तव्य केलंय. राज्याचा मंत्रिमंडळ अजित पवार यांच्यामुळेच होत नाहीये, असं उपरोधिक वक्तव्य सदाभाऊ खोत यांनी केलंय. अजित पवारांमुळेच मंत्रिमंडळाचा विस्तार लांबला आहे. कारण त्यांचा मुहूर्त अजून ठरत नाही. असं खोचक वक्तव्य सदाभाऊ खोत यांनी केलंय.

सात महिने झाले तरी राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार होत नाही, यावरून अजित पवार यांनी एकनाथ शिंदे सरकारवर निशाणा साधला होता. नऊ महिन्यात बाळ जन्माला येतं, पण इथे सरकारला सात महिने झाले तरी विस्तार होत नाही, असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं होतं. यावरून सदाभाऊ खोत यांची प्रतिक्रिया विचारली असता, त्यांनी अजित पवार यांनाच कारणीभूत ठरवलं. ते म्हणाले अजित पवार यांचाच मुहूर्त अजून ठरत नाही शपथविधी कधी घ्यायचा? हे नक्की झालं की मंत्रिमंडळ विस्तार होईल असा टोला त्यांनी लगावला.