‘हेरा फेरी 3’ च्या शूटिंगला सुरुवात; बाबू भैय्या, श्‍याम आणि राजू येणार प्रेक्षकांच्या भेटीस

बॉलिवूडमधील काही कल्ट सिनेमांची नावं काढली तर काही त्यात एका सिनेमाचं नाव पहिल्या पाचात येत तो सिनेमा म्हणजे फिर हेरा फेरी. सिनेमाचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची घोषणा काही महिन्यांआधी करण्यात आली. हेरा फेरी 3ची प्रेक्षकांमध्ये चांगलीच उत्सुकता आहे. अखेर सिनेमाच्या शुटींगला सुरूवात झाली आहे. मुंबईच्या एम्पायर स्टुडिओमध्ये सिनेमाचं शुटींग सुरू करण्यात आलंय. अभिनेता अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल यांची धम्माल केमिस्ट्री त्यातून येणारी अफलातून कॉमेडी पुन्हा एकदा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. दरम्यान सिनेमात अक्षय कुमार दिसणार आहे की नाही बाबत अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत.

‘हेरा फेरी 3’चे दिग्दर्शन अनीज बज्मी नाही तर फरहाद सामजी साकारणार आहेत. आहे. एका वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, ‘हेरा फेरी 3’ या चित्रपटाचे शूटिंगही सुरू झाले आहे. काही दिवसांपूर्वी अक्षय कुमारने चित्रपटाची स्क्रिप्ट आवडली नसल्याचे कारण सांगून चित्रपटाला नकार दिला आहे. असं म्हटलं जात होते. पण रिपोर्टनुसार आता ‘हेरा फेरी 3’ मध्ये राजू ही भूमिका अक्षय कुमारचं साकारणार आहे व शूटिंगला सुरुवात देखील झाली आहे.

हेरा फेरी हा सिनेमा 2000मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला. 1 मार्च 2000 ला सिनेमा रिलीज झाला होता. सिनेमाचं बजेट 7.5 कोटी रुपये होतं. बॉक्स ऑफिसवर 17.8 कोटींची कमाई केली होती. त्यानंतर 2006मध्ये फिर हेरा फेरी हा त्याचा सिक्वेल आला. 9 जून 2006ला सिनेमा रिलीज झाला. सिनेमाचं एकूण बजेट 18 कोटी होतं तर सिनेमानं बॉक्स ऑफिसवर 69.12 कोटींची कमाई केली होती. त्यानंतर आता हेरा फेरी 3 प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मागील दोन सिनेमांप्रमाणेच हेरा फेरी 3ही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल यात काही शंका नाही.