माेदी आणि आरएसएस यांना पराभूत करण्यासाठी दुबई किंवा साैदी अरेबियाला गेलेल्या लाेकांनाही आणा. अगदी ज्यांचा मृत्यू झाला आहे त्यांच्या नावानेही मतदान करून घ्या, असे वादग्रस्त आवाहन काॅंग्रेसचे पुण्याचे माजी नगरसेवक उस्मान हिराेली यांनी केले आहे.राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासमाेरच त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. पुण्यातील कसबा मतदारसंघाच्या पाेटनिवडणुकीसाठी शरद पवार यांच्या उपस्थितीत अल्पसंख्यांक समाजाचा मेळावा झाला. यावेळी हिराेली म्हणाले माेदी आणि आएसएसला हरविण्यासाठी आपल्या लाेकांचे 99 टक्के नाही तर 100 टक्के मतदान व्हायला हवे. त्यासाठी सगळीकडून लाेक आले पाहिजते.
भारतीय जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी हिराेली यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडी च ट्विटरवर शेअर केला आहे. त्यांनी म्हटले आहे की माेदी आणि आरएसएसला पराभूत करण्यासाठी दुबईवरून लोक आणा सौदी वरून लोक आणा मेलेले आहेत त्यांना हजर करा असे विधान शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या अल्पसंख्याक बैठकीत केले. काँग्रेसचे माजी नगरसेवक उस्मान हिरोली बोगस मतदान घडविण्याची योजना उघडपणे आखात आहेत. निवडणूक आयाेगाने या वक्तव्याची दखल घ्यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.
