बाेगस कर्जाचा आकडा जाहीर करा; नाही तर आम्ही करू – किरीट साेमय्या

काेल्हापूर जिल्हा बॅंकेतून (केडीसीसी) हसन मुश्रीफ यांनी नेमके किती बोगस कर्ज घेतलं आहे याची माहिती द्यावी. 7 दिवसाची मुदत देतो आकडा जाहीर तुम्ही करा नाहीतर आम्ही जाहीर करतो. ईडीसह सगळे विभाग देखील चौकशी करत आहेत असे आव्हान भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट साेमय्या यांनी थेट काेल्हापूरमध्ये जाऊन हसन मुश्रीफ यांना दिले.

कोल्हापूर दौऱ्यावर असलेल्या सोमय्यांनी आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर 500 कोटींच्या गैरव्यवहाराचा आरोप केला. ते म्हणाले कर्जदारांची टॉप 25 नावे जाहीर करावीत. ऑडिटरची पण चौकशी सुरू आहे. अनेक शेतकरी मुबंईला भेटण्यासाठी येत होते. त्यामुळे मीच जावे असा विचार केला. शेतकरी, अधिकारी, संचालक भेटले. केडीसीसी मजबूत राहणार असून ठेवीदारांची रक्कम सुरक्षित राहणार आहे. एका व्यक्तीने घोटाळा केल्याने चौकशी लागली आहे तर ती बँकेची चौकशी नव्हे. जर चूका झाल्या तर त्या दुरुस्त केल्या जातील. हसन मुश्रीफ आणि परिवार, कंपन्यांवर धाडी टाकल्या होत्या. सध्या वेगवेगळ्या दिशेने त्याचा तपास जात आहे. ही बँकेची नव्हे, तर मुश्रीफ यांच्या आणि त्यांच्या कुटुंबाशी आणि मित्रपरिवारशी संबधित आर्थिक व्यवहाराची ही चौकशी सुरु आहे. शेतकऱ्यांना पुढे करून जर दगा केला जात असेल तर चौकशी थांबणार नाही.