मित्रांनी तर हात सोडलाच पण पक्षातील नेत्यांनीही सोडली संजय राऊतांची साथ

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या वक्त विधिमंडळ नाही तर चोरमंडळ आहे असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून मित्र पक्षांनी त्यांची साथ देण्याचे नाकारले आहेच पण स्वतःच्या पक्षातील लोकांनीही बाजू सोडली आहे.राऊत यांच्या या वक्तव्यामुळे लोकशाही धोक्यात आल्याचे सांगत त्यांच्यावर हक्कभंग आणण्याची मागणी सत्ताधारी आमदारांनी केली. विशेष म्हणजे राऊत यांची नेहमी साथ देणारे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते

अंबादास दानवे यांनी म्हटले आहे की संजय राऊत यांच्या वक्तव्याचं समर्थन केलेलं नाही.अजित पवार म्हणाले, आपण कोणत्याही पक्षाचे असतो, तरी पाच लाख लोकांचं प्रतिनिधित्व आपण करतो. कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्याला कोणालाही चोर म्हणण्याचा अधिकार नाही. राजकीय मतभेद बाजुला ठेऊन हा विषय गांभीर्याने घेण्याची गरज आहे. प्रत्येकाने शिस्त पाळली पाहिजे. मात्र, संजय राऊत खरोखरच बोलले का? हे सुद्धा तपासण्याची गरज आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, संजय राऊतांनी जे वक्तव्य केलं, ते निषेधार्थ आहे. त्याचं कुणीही समर्थन करण्याचं काहीही कारण नाही. विधिमंडळाचा नाहीतर राज्यातील जनतेचा अवमान करण्याचा कुणालाच अधिकार नाही.संजय राऊत हे आगलावे आहेत. महाराष्ट्रात टेंभा घेऊन आग लावत हिंडणारं हे एक कार्टं आहे, त्याच्याकडे लक्ष देऊ नका अशी शेलकी प्रतिक्रिया शहाजी पाटील यांनी व्यक्त केली.