पहाटेच्या शपथविधीवरून राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते अजित पवार यांची पुरती काेंडी सुरू असल्याचे चित्र आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘जेव्हा ते (उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस) आणखी सांगतील तेव्हा तर सगळ्यांना माेठा शाॅक बसेल असा दावा केला.
राज्यातील सत्तांतरानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले नाहीत तेव्हा धक्का बसला. राज्यपाल काेश्यारीही अवाक झाले असे अजित पवार म्हणाले हाेते. यावर प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, जेव्हा आपणदेखील पहाटे, साखरझाेपेत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तेव्हा मला फाेन आला हाेता. मला म्हणाले काय आहे ते बघा. मी टीव्ही लावला. बघताेय तर शपथविधी. मी त्यांना म्हणालाे अहाे हे मागचं आहे. बाेलले मागचे नाही आताचेच आहे. मग जयंतरावांना फाेन करताेय तर तेही फाेन उचलेनात. म्हटलं जयंतरावही तेथेच आहेत का? ताे खरं म्हणजे माेठा शाॅक हाेता. पण त्यातल्या अनेक सुरस कथा आहेत त्या हळुहळु बाहेर येताहेत. तीन – चार मला यांनी (देवेंद्र फडणवीस) यांनी सांगितल्या. सगळ्या नाही सांगितल्या. पण त्या मी येथे बाेलू इच्छित नाही. अनेक लाेकांची त्यामध्ये पंचायत हाेऊ शकते.त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बघून म्हणाले, तुम्ही सांगितले ते अर्धेच सांगितले आहे. पण ते जेव्हा आणखी सांगतील तेव्हादेखील माेठा शाॅक लाेकांना बसेल.
