नितीन गडकरींच्या नावे दिशाभूल करणारी वक्तव्ये व्हायरल ; नागपूर पोलिसांत तक्रार दाखल

कसबा विधानसभा पाेटनिवडणुकीबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या नावाने खाेटी व्हॉट्स ॲप ग्रूपवर खोटी आणि दिशाभूल करणारी वक्तव्ये व्हायरल केली जात आहेत. याप्रकरणी नागपूर पाेलीसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.नितीन गडकरी यांच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवरून ही माहिती देण्यात आली आहे. पुण्यातील कसबा मतदारसंघ पोटनिवडणुकीचा निकाल काल लागला. यामध्ये महाविकास आघाडीचे रविंद्र धंगेकर हे विजयी झाले आहेत. त्यांनी ११ हजार ४० मतांनी भाजपाच्या हेमंत रासने यांचा पराभव केला.

या निकालावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत विरोधक भाजपावर टीका करत आहेत. त्यामध्ये गडकरी यांच्या नावाने व्हॉट्स ॲप ग्रूपवर खोटी आणि दिशाभूल करणारी वक्तव्ये व्हायरल होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. गडकरी यांच्या अधिकृत ऑफिशियल ट्वीटरद्वारे माहिती देताना म्हटले आहे की पुण्यातील कसबा निवडणूक निकालाबाबत केंद्रीयमंत्री नितीन गडकरींच्या नावाने व्हॉट्स ॲप ग्रूपवर खोटे आणि दिशाभूल करणारी वक्तव्ये व्हायरल केली जात आहेत.या संदर्भात नागपूर पोलिसांकडे तक्रार करण्यात आली असून गडकरींच्या नावाने अशा प्रकारे खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या बातम्या पसरवणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची विनंती नागपूर पोलिसांना करण्यात आली आहे.