महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे हे शुक्रवारी सकाळी शिवाजी पार्क येथे मॉर्निंग वॉकला गेले असता त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. टोळक्याने देशपांडे यांना स्टम्पच्या साहाय्याने मारहाण केली आहे.
त्यांना उपचारांसाठी हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले असून डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे. त्यांच्या हाताला आणि पायाला दुखापत झाली आहे. याबाबत देशपांडे म्हणाले, “आम्हाला घाबरविण्याचा कोणीही प्रयत्न करू नये. आम्ही कुणालाही घाबरत नाही. या हल्ल्यामागे कोण आहे हे सर्वांना माहिती असून कुणालाही भीक घालत नाही. मी माझं काम करत रहाणार असल्याचे ते म्हणाले. दरम्यान पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे.
