मनसेचे नेते संदीप देशपांडे सातत्याने मुंबई महापालिकेचे भ्रष्टाचार बाहेर काढत आहेत. माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नम्र विनंती आहे की आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांची चौकशी करावी आणि जर काही तथ्य निघाले तर त्यांना अटक करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमेय खाेपकर यांनी केली आहे.
खाेपकर म्हणाले संदीप देशपांडे गप्प बसणारा माणूस नाही. मुंबई पोलीस आणि प्रशासनाने संदीप देशपांडे यांना योग्य ती सुरक्षा पुरवावी. आजच्या भ्याड हल्ल्याचे उत्तर नक्की मिळेल. पाठीमागून हल्ले करायचे नाहीत. मर्द असाल तर पुढे या. संदीप देशपांडे सतत मुंबई महापालिकेचे भ्रष्टाचार बाहेर काढत असेल आणि त्यांच्यावर हल्ले होत असतील तर आम्ही गप्प बसायचे का?” संदीप देशपांडे हे शिवाजी पार्कवर वॉक करत असताना चार जणांनी त्यांच्यावर हल्ला केला. क्रिकेटच्या स्टम्प्सने हल्ला घाला. चाैघांनीही चेहरा कपड्याने झाकला होता. संदीप देशपांडे हे शिवाजी पार्कवर मॉर्निंग वॉकला जातात याची आरोपींना कल्पना होती. त्यानुसार प्लॅनिंग करून हा हल्ला करण्यात आला आहे. हल्ला केल्यानंतर आरोपींनी तिथून पळ काढला.
