मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर मॉर्निंग वॉक गेले असता अज्ञात इसमांनी हल्ला केला होता. याप्रकरणी दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यानंतर संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषद घेत घटना सांगितली. केवळ क्रिकेटर नाही तर कोच पण बाहेर येतील. जेव्हा आरोपी पकडला जाईल तेव्हा मी अधिक बोलेन. ही वीरप्पन गँग कोण आहे हे सगळ्यांना माहित आहे असा निशणाही त्यांनी ठाकरे गटावर साधला.
शुक्रवारी सकाळी मी नेहमी प्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी निघालो होतो. सकाळी शिवाजी पार्कच्या गेट नंबर पाच पाचजवळ असताना माझ्यावर एका व्यक्तीने स्टंपने हल्ला केला. मी मागेवळून बघताच तो माझ्या डोक्यावर स्टंपने हल्ला करण्याच्या प्रयत्नात होता. मी लगेच माझ्या उजव्या हाताने स्टंप पकडण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात दुसऱ्या एका व्यक्तीने स्पंटने माझ्या पायावर हल्ला केला. त्यानंतर याठिकाणी उपस्थित लोक माझ्या दिशेने धावून आल्यानंतर हल्लेखोरांनी तिथून पळ काढला अशी संदिप देशपांडे यांनी दिली.
ही वीरप्पन गँग कोण आहे हे सगळ्यांना माहित आहे. दोन फर्म आहेत महावीर आणि ग्रेस फर्निचर आहेत. 10 लाखांचा टर्नओव्हर कोविड नंतर कोट्यावधीवर गेला. जर एखादा कंत्राटदार एखादी गोष्ट पुरवत आहेत तर ते त्याने खरेदी केलं पाहिजे. मी आयुक्तांना भेटलो. हा जो घोटाळा आहे, देढिया नावाचा एक माणूस आहे. त्याचे देखील फोटो शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत आहे. हे सगळे घोटाळे आणि गोष्टी त्यांना बंद करायच्या असत्या तर माझ्या थोबाडवर मारायला हवं होतं. मगच माझं थोबाड बंद झालं असतं, असेही संदीप देशपांडे म्हणाले आहेत.
