गलवानमध्ये वीस भारतीय जवान चीनच्या हिंसाचारात शहीद झाले. मात्र तरीही चीन प्रेमाचा पुळका आलेल्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांना चीनच्या साम्यवादी पक्षाने सद्भावना वाढवण्याचे काम केले असे वाटत आहे.ब्रिटनच्या केंब्रिज विद्यापीठात चीनची प्रशंसा करताना राहूल गांधी म्हणाले की, चीनचे इन्फ्रास्ट्रक्चर पाहा, तेथील रेल्वे असो किंवा विमानतळ, सर्वकाही निसर्गाशी निगडीत आहे. चीन निसर्गाशी घट्टपणे जोडलेला आहे. दुसरीकडे अमेरिकेविषयी बोलायचे तर तो स्वतःला निसर्गापेक्षा मोठा समजतो. यावरून चीनला शांतता आवडते हे स्पष्ट होते. तेथील सरकार एखाद्या कॉर्पोरेशन सारखे काम करते.
9/11 हल्ल्यानंतर अमेरिकेने बाहेरील लोकांना नोकरी देणे कमी केले. याऊलट चीनच्या साम्यवादी पक्षाने सद्भावना वाढवण्याचे काम केले. एव्हढेच नाही तर राहुल गांधी यांनी काश्मीरमधील दहशवाद्यांचेही कौतुक केले. ते म्हणाले, “भारत जोडो यात्रेत एक अज्ञात व्यक्ती माझ्याजवळ आला. त्याने माझ्याशी बोलण्याची इच्छा व्यक्त केली. त्याने मला प्रश्न केला की, तुम्ही खरेच जनतेच्या समस्या ऐकण्यासाठी आला आहात का? तो आसपासच्या काही लोकांकडे इशारा करत म्हणाला की ते सर्व अतिरेकी आहेत. काही क्षणांसाठी मला मी संकटात सापडल्याचे वाटले. हे अतिरेकी मला ठार मारतील असा विचारही आला. पण त्यांनी काहीच केले नाही. हीच ऐकण्याची शक्ती आहे.
