गेल्या वर्षी ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली. फक्त भारतातच नाही तर बॉक्स ऑफिसवरही त्याने चांगलीच कमाई केली. ब्रह्मास्त्रने रिलीजच्या पहिल्या आठवड्यात दमदार कमाई करत २०० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करून दबंग सलमानच्या सुलतान चित्रपटाचा विक्रम मोडित काढला. इतकी दमदार कमाई केल्यानंतर चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी चित्रपटाच्या सिक्वलची घोषणा केली.
‘ब्रह्मास्त्र’ या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा अयान मुखर्जीने सांभाळली आहे. आता ‘ब्रह्मास्त्र 2’बाबत त्याने महत्त्वाची माहिती दिली आहे. नुकत्याच एका मुलाखतीत अयान मुखर्जी म्हणाला की, ‘ब्रह्मास्त्र 2’ या सिनेमावर आमचे काम सुरु असून लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येईल. पहिल्या भागापेक्षा दुसरा भाग अधिक प्रेक्षणीय असेल. ‘ब्रह्मास्त्र’ या सिनेमाचा दुसरा भाग रिलीज करायला आम्ही 10 वर्षे लावली तर आमचा सिनेमा पाहायला प्रेक्षक येणार नाहीत. येत्या दोन वर्षात हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येईल”.
यातील दुसऱ्या भागातील ‘देव’च्या भूमिकेत कोण दिसणार याची चर्चा गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. रणवीर सिंहपासून यशपर्यंत अनेक नावांची चर्चा होत आहे. या भूमिकेत कोण दिसणार याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. अयानने दिलेल्या माहितीनुसार ‘ब्रह्मास्त्र २’ २०२५ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
