रस्त्यावर पोपट घेऊन जे भविष्यवाणीसाठी बसत होते त्यांची उपासमार का करताय? त्यांना भविष्य सांगू दे. तुम्ही का त्या रांगेत जाऊन बसताय? अशी खोचक टीका महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली आहे.पत्रकारांशी बोलताना विखे-पाटील म्हणाले.
शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. मात्र इतर पुढाऱ्यांप्रमाणे जे जे स्वप्नरंजन करतायेत त्या यादीत पवार साहेब पण सामील झाले हे दुर्दैव आहे. महाविकास आघाडीत भविष्यकारांची संख्या जास्त होत चालली आहे.रस्त्यावर पोपट घेऊन जे भविष्यवाणीसाठी बसत होते त्यांची उपासमार का करताय?त्यांना भविष्य सांगू दे. तुम्ही का त्या रांगेत जाऊन बसताय? बाळासाहेब थोरात यांच्यावर टीका करताना विखे पाटील म्हणाले नाशिक पदवीधर निवडणुकीत महाविकास आघाडीतील उमेदवाराचा पराभव झाला त्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारायला हवी. त्या पराभवाबद्दल ते का बोलत नाही. कसब्यातील आमच्या पराभवानंतर प्रत्येक जण त्याचा हवाला देतोय. प्रत्येक जण दाखला देतोय. प्रत्येक जण स्वप्नरंजन करतोय. त्यामुळे मुंगेरीलाल के हसीन सपने आम्ही थांबवू शकत नाही. त्यांना आनंद घेऊ द्या.
