सुप्रिया सुळे यांनी मटण खाऊन महादेवाचे दर्शन घेतले – विजय शिवतारे

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारसुप्रिया सुळे यांनी मटण खाऊन महादेवाचे दर्शन घेतले असा आरोप माजी मंत्री आणि शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी केली आहे. याबतचा व्हिडिओच त्यांनी शेअर केला आहे.

सुप्रिया सुळे यांनी मटण खाऊन महादेवाचे दर्शन घेतले असल्याचे शिवतारे यांनी म्हटले आहे. यामुळे सुप्रिया सुळे नव्या वादात सापडण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. त्यांनी मटण खाऊन दर्शन घेतल्याने त्यांच्यावर टीका सुरू झाली आहे. शिवतारे यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की,सुप्रिया सुळे यांनी पुण्यातील एका हॉटेलमध्ये मटण खाल्लं आणि नंतर देवदर्शन केलं. आधी मटण खाल्लं मग भैरवनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. मग महादेव मंदिरात गेल्या. मग दिवे घाट ओलांडून सासवडला गेल्या. सासवडला संत सोपानकाकांचे दर्शन घेतले येणेवरे ज्ञान देवो सुखिया जाहला अशी खोचक टीका शिवतारे यांनी केली आहे.