राज्यात काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार राज्यात पुढचे काही दिवस मुसळधार पाऊस येण्याची शक्यता आहे. ५ ते ८ मार्च दरम्यान विजांच्या कडकडाटासह पाऊसा होऊ शकतो. हवामान खात्याच्या अंजानुसार काल बुलढाण्यात पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. तसेच अन्य ठिकाणी देखील पावसाने हजेरी लावली आहे.
मध्यरात्रीपासून ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस बरसत आहे.या अवकाळी हजेरीमुळे कांदा, गहू, हरभरा, आंबा, द्राक्षं यांसह भाजीपाल्याला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.एकीकडे शेतमालाला भाव नसताना दुसरीकडे अवकाळी पावसाच्या हजेरीने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. तर पावसामुळे अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाली आहे.नाशिक जिल्ह्याला अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. काल रात्रीपासून अनेक भागात अवकाळी पावसाच्या जोरदार सरी बरसल्या आहेत. जिल्ह्यातील इगतपुरी, सिन्नर तालुक्यासह अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार अवकाळी पाऊस पडला आहे. काही ठिकाणी अवकाळी पावसासह गारपीट देखील झाली आहे. द्राक्षांसह अन्य पिकांना मोठा फटका बसण्याची भीती असल्यामुळे शेतकरी हवालदिल झालेत.
