वारं नाही बदलले तुमचे वासे फिरले आहेत, विखे पाटलांचे विरोधकांवर टीकास्त्र

अहमदनगर : मुंबईच्या बॉम्बस्फोटमध्ये हजारो निरपराध लोकं मारले गेले, त्या नवाब मालिकांचा सुद्धा राजीनामा घेण्याच धाडस राष्ट्रवादीच्या नेत्यांना झालं नाही आणि ते आम्हाला शिकवताय की आता वार बदलतंय. वारे नाही बदललं तुमचे वासे फिरलेत, अशी टीका महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली. माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर तालुक्यातील जोर्वे गावात विद्यमान महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. विविध विकासकामांचे उद्घाटन करते वेळी विखे यांनी विरोधकांवर टीका केली. यावेळी बोलताना विखे पाटील म्हणाले, लोकांना तुम्ही बुद्धू समजू नका. अतिरेक्यांशी संबंध असणाऱ्या मालिकांना तुम्ही मंत्रिमंडळात ठेवलं.