पुण्यातील कसबा पोटनिवडणुकीमध्ये भाजपला पराभवाचा धक्का सहन करावा लागला. या निकालानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याबद्दल आक्षेपार्ह मजकूर व्हॉट्सअपवर व्हायरल झाला होता. याच पार्श्वभूमीवर आता यवतमाळमधून एकाला ताब्यात घेण्यात आले आहे.
कसबा पोटनिवडणुकीत भाजपने आपला बालेकिल्ला गमावला तर दुसरीकडे नितीन गडकरींच्या नावाने एक मेसेज व्हायरल झाला. या संबंधात नितीन गडकरी यांनी नागपूर पोलिसांमध्ये तक्रार दिली होती. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी येथील ठाकरे गटाच्या तालुकाध्यक्षाला सायबर पोलिसांनी ताब्यात घेतले होते, चार तासांच्या चौकशीनंतर सूचना पत्र देऊन त्याला सोडण्यात आले.

