मज्जा आहे बाबा एका माणसाची, संदीप देशपांडे यांचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला

मुंबई : भावी पंतप्रधानांना शुभेच्छा. भंकस वाटली असेल तर माफ करा. पण बुरा ना मानो होली है” असे खोचक शब्दांत ट्वीट करत मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. या ट्वीटमध्ये संदीप देशपांडेंनी म्हटलं आहे. तसेच, “आता तुमच्याशी हिंदीतच बोललं पाहिजे. तुम्ही आता पंतप्रधान होणार मज्जा आहे बाबा एका माणसाची.

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सोमवारी उद्धव ठाकरेंच्या पंतप्रधानपदाविषयी केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे. त्याच वक्तव्यावरून मनसे नेते संदीप देशपांडे यांनी खोचक टोला लगावला आहे. उद्धव ठाकरे २०२४ मध्ये पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील का? असा प्रश्न राऊतांना पत्रकारांनी विचारला असता त्यावर “पंतप्रधान पदासाठी उद्धव ठाकरे उत्तम चेहरा आहेत. मात्र, २०२४ कोण होईल यापेक्षा विरोधकांनी एकत्र येणं गरजेचं आहे”, असं संजय राऊत म्हणाले होते.