अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत विरुध्द ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमधील ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अंतिम कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यासाठी दोन्ही देशातील पंतप्रधानांनी हजेरी लावली आहे.
सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यासाठी दोन्ही देशातील पंतप्रधानांनी हजेरी लावली आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. कारण हा सामना जिंकून भारतीय संघाला मालिका जिंकण्याची संधी असणार आहे.
पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाला पराभूत केल्यानंतर आणि 2023 मालिकेतील तिसरी कसोटी गमावल्यानंतर भारताने सध्या ट्रॉफी कायम ठेवली आहे. जर ऑस्ट्रेलियाने चौथी कसोटी जिंकली आणि मालिका अनिर्णित राहिली, तर 2020-21 मालिका मेन इन ब्लूच्या बाजूने गेल्याने भारत ट्रॉफी राखेल, असे खेळाचे तज्ज्ञ सांगतात.
हा सामना सुरु होण्यापूर्वी नरेंद्र मोदी आणि अँथनी अल्बनीज यांनी एका विशिष्ट प्रकारच्या रथात बसून पूर्ण मैदानाची प्रदक्षिणा घातली. तसेच मैदानावर सामना पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांना हात दाखवून अभिवादन देखील केले.
नरेंद्र मोदी आणि अल्बानीज यांची भेट हा भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मैत्रीला 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या समारंभाचा एक भाग आहे. मिळालेल्या माहितीनुसार दोन्ही देशाचे पंतप्रधान दिड तास या सामन्याचा आनंद घेणार आहेत.
दरम्यान, अल्बानीज यांनी यापूर्वी अहमदाबाद येथील साबरमती आश्रमाला भेट दिली. या वेळी त्यांनी महात्मा गांधी यांच्या कार्याचे कौतुक व्यक्त केले. त्यांनी गांधी राहत असलेल्या ‘हृदय कुंज’ या खोलीला भेट दिली आणि चरखा वापरून खादीचे विणकाम पाहिले. आश्रमाने त्यांना ऑस्ट्रेलियन लेखक थॉमस वेबर यांनी गांधींच्या सॉल्ट मार्चबद्दल लिहिलेले पुस्तक, 1915 ते 1930 या काळात अहमदाबादमधील त्यांच्या जीवनाबद्दलचे पुस्तक आणि चरखाची प्रतिकृती भेट म्हणून दिली.
