उद्धव ठाकरेंना सोडून शिंदे गटात गेलेल्या आमदारांवर विरोधक गद्दार गद्दार अशी टीका करतात. तर दोन दिवसांपूर्वी बच्चू कडू यांना नाशिकमध्ये काही लोकांनी अडवून गद्दार असं म्हंटल होतं. त्यावर बच्चू कडू यांनी अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथील ठाकरे गटाने आयोजित केलेल्या शिवजयंतीच्या कार्यक्रमात ‘गद्दार’वर स्पष्टीकरण दिलं.
अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथील शिवजयंतीच्या कार्यक्रमात बच्चू कडू उपस्थित होते. त्यावेळी उपस्थितांना संबोधित करताना बच्चू कडू म्हणाले की, ‘काही लोकं आह्माला गद्दार म्हणतात. आम्ही गद्दार आहोत पण नेत्यांचे गद्दार आहोत. जनतेचे गद्दार आम्ही कधी होणार नाही. फक्त जनतेसाठी काम करणार नेत्यांची गुलामगिरी करणारा नाही असंही बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.तसेच विश्वास आणि निष्ठेविषयी बोलताना पुढे ते म्हणाले की, ‘निष्ठा नेत्यांवर,पक्षावर व माझ्यावरही ठेवू नका. निष्ठा आपल्या देशावर आपल्या बापावर ठेवा,असंही बच्चू कडू म्हणालेत. उद्धव ठाकरेंना सोडून शिंदे गटात गेल्यावर आमदार बच्चू कडू यांना नाशिकमध्ये काही लोकांनी अडवून गद्दार असं म्हंटल होतं, त्यावर त्यांनी यावेळी उत्तरं दिलं आहे.
