मातोश्रीच्या अत्यंत निकटवर्तीय असणारे नेते सुभाष देसाई यांचे पुत्र भूषण देसाई हे एकनाथ शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. बाळासाहेब ठाकरे ते आदित्य ठाकरे यांच्या सोबत एकनिष्ठ राहिलेले सुभाष देसाई यांच्या घरातच फूट पडल्याचं दिसून येत आहे. कारण त्यांचे पुत्र भूषण देसाई हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांच्या पक्षात प्रवेश करणार आहेत.
यापूर्वी शिवसेनेच्या अनेक बड्या नेत्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. यामुळे सुभाष देसाईंच्या घरात उभी फूट पडण्याची शक्यता आहे. देसाई अत्यंत निकटवर्तीय असल्यानं ठाकरेंना मोठा धक्का मानला जातोय. भूषण देसाई हे शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. आजच बाळासाहेब भवनात मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत भूषण देसाई यांचा पक्ष प्रवेश होण्याची शक्यता आहे.
