जगातील सर्वात मोठ्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. आपल्या यशस्वी राजकीय कारकिर्दिने त्यांनी जगभरात प्रभावशाली नेते म्हणून प्रसिद्धी मिळवली आहे. गेल्या ९ वर्षांपासून मोदी जागतिक स्तरावर देशाचे नेतृत्व करत आहेत. आता शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी पंतप्रधान मोदींच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. नोबेल पुरस्कार समितीच्या सदस्यानेच पंतप्रधान मोदींचे कौतूक केले आहे. त्यामुळे आगामी काळात कदाचित भारतीयांना नोबेल पुरस्काराशी संबंधित मोठी बातमी ऐकायला मिळू शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे.
नोबेल समितीचे उपनेते आस्ले तोजे म्हणाले की, ‘भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ज्या पद्धतीने रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना युद्धाबाबत समज दिली, ते कौतुकास्पद आहे. त्यांनी धमकी/दबाव न देता आण्विक युद्धाच्या परिणामांबद्दल संदेश दिला, आंतरराष्ट्रीय राजकारणात आपल्याला अशा नेत्यांची गरज आहे पुढे बोलताना ते म्हणाले, “आम्हाला नोबेल शांतता पुरस्कारासाठी मोठ्या प्रमाणात भारतीय नामांकन मिळत आहेत. मला आशा आहे की जगातील प्रत्येक नेता नोबेल शांतता पुरस्कारासाठी आवश्यक असलेले काम करेल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख करत ते म्हणाले, मोदींसारख्या ताकदवान नेत्यामध्ये शांतता प्रस्थापित करण्याची जबरदस्त क्षमता आहे. पीएम मोदी हे अतिशय शक्तिशाली देशातून आले आहेत, त्यांना खूप गांभीर्याने घेतले जाते. त्याच्यामध्ये अफाट विश्वासार्हता आहे. पंतप्रधान मोदी रशिया, अमेरिका आणि चीनच्या प्रमुखांशी युद्धाबाबत बोलले आहेत. त्यांनी आगामी भविष्य युद्धाचे नाही तर शांततेचे असावे, असे सांगितेल आहे. मला आनंद आहे की मोदी केवळ भारताला पुढे नेण्याचे काम करत नाहीत तर जगातील शांततेसाठी काम करत आहेत. असे ते म्हणाले. आता या वक्तव्याच्या पलिकडे जाऊन नोबेल शिफारस समिती पंतप्रधान नरेंद्र मोदी संदर्भात कोणती शिफारस करते? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
‘भारत महासत्ता होणार हे निश्चित’
नोबेल समितीच्या नेत्याने भारताला विकसित देश बनवण्यात पंतप्रधान मोदींच्या योगदानाबद्दल त्यांचे कौतुक केले. ‘भारत हा शांततेचा वारसा आहे. भारत महासत्ता बनणार आहे. पीएम मोदी हे युद्ध थांबवणारे सर्वात विश्वासू नेते आहेत आणि ते जगात नक्कीच शांतता प्रस्थापित करू शकतात. मला आनंद आहे की मोदी केवळ भारताला पुढे नेण्याचे काम करत नाहीत तर जगातील शांततेसाठी महत्त्वाच्या असलेल्या मुद्द्यांवरही ते काम करत आहेत,’ असेही ते म्हणाले.
