नवी दिल्ली : शिवसेना नाव आणि चिन्हावरील सुप्रीम कोर्टातील सुनावणी लांबणीवर गेली आहे. एक महिन्यानंतर, २४ एप्रिल या प्रकरणावर सुनावणी हाेणार आहे. ही सुनावणी उद्या( शुक्रवारी) होणार होती.
केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण पक्षचिन्ह शिंदे गटाला दिल्यानंतर ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल तर शिंदे गटाकडून नीरज कौल युक्तिवाद करत आहेत. शिंदे गट आणि ठाकरे गटाला नोटीस बजावली हाेती. मात्र, निवडणूक आयोगाच्या निर्णयावर स्थगिती देण्यास नकार दिला आहे.
