शेतकऱ्यांचा किसान लाँग मार्च स्थगित; शेतकरी नेते जे.पी.गावित यांची माहिती

शेतकऱ्यांचा किसान लाँग मार्च स्थगित झाला आहे. अशी माहिती शेतकरी नेते जे.पी.गावित यांनी दिली आहे. जे. पी. गावित यांनी सांगितले की, जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला निवेदनाची प्रत दिली. 70 टक्के मागण्या सरकारकडून मान्य करण्यात आल्या आहेत. सरकारच्या निवेदनाची प्रत मोर्चेकरांना वाचून दाखवणार असल्याचे गावित यांनी सांगितले.तसेच आमच्या मागण्या मान्य केल्याबद्दल सरकारचे आभार. असे देखिल त्यांनी म्हटले आहे.

आज सकाळपासून आंदोलन स्थगित होणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. मागण्या मान्य न झाल्यास आम्ही आंदोलनावर ठाम राहू असा निर्धार आंदोलक शेतकऱ्यांनी केला होता. मात्र बैठकीच्या झालेल्या चर्चेनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी मागण्या मान्य झाल्याची प्रत जेपी गावित यांना दिल्यानंतर आंदोलन मागे घेत असल्याचे ते म्हणाले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधत नेमकं काय घडलं? ते स्पष्ट केले. यावेळी माजी आमदार जीवा पांडू गावित म्हणाले की, “आम्ही सतरा मागण्या केल्या होत्या, यापैकी काही मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली. तर काही मागण्या एक महिन्याने अंमलात येणार आहेत. तर काही मागण्या या केंद्राशी संबंधित असल्याने त्या केंद्राकडे पाठवण्यात येणार आहेत. या मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी एक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून आमच्या 70 टक्के मागण्या मान्य झाल्या आहेत.