बलात्कार पीडितेचा फाेटाे टि्वट केला, असंवेदनशील संजय राऊतांवर गुन्हा दाखल हाेणार का?

मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एका बलात्कार पीडितेशी अत्यंत असंवेदनशील वर्तन केले आहे. या पीडितेचा फाेटाे त्यांनी ट्विट केला आहे. भारतीय दंड विधान संहितेनुसार बलात्कार पीडितेची ओळख उघड करणे अपराध असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल हाेणार का? असा सवाल केला जात ओहे.

 राऊत यांनी रक्तबंबाळ अवस्थेतील पीडित मुलीचा फोटो ट्वीवटरवर शेअर करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील बळेवाडी येथील ही घटना आहे. एका अल्पवयीन मुलीवर आगोदर बलात्कार आणि नंतर तिच्या कुटुंबीयांवर गुंडांनी हल्ला केल्याची घटना मागील आठवड्यात घडली होती. पीडित मुलीवर अद्यापही उपचार सुरु आहेत. राऊत यांनी थेट या मुलीचा फाेटाेच ट्विट केला आहे. या मुलीची जातही राऊत यांनी उघड केली आहे. 

 भारतीय दंडसंहितेच्या कलम 228 नुसार बलात्कार अथवा लैंगिक छळामधील पीडीतांची ओळख ही गुप्तच ठेवावी लागले. ती उघड करता येत नाही. पीडीतांचे नाव छापणाऱ्या किंवा प्रकाशित करणाऱ्या व्यक्तीला किंवा संस्थेला याबाबत दोषी ठरवलं जाते.  दोन वर्षांचा तुरुंगवास आणि दंड अशी शिक्षा हाेऊ शकताे.