मुंबईजवळील मीरा रोड येथील धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या दिव्य दरबारावेळी चोरट्यांनी चांगलाच डल्ला मारला. या कार्यक्रमादरम्यान कार्यक्रमात सहभागी महिलांचे सुमारे 4 लाख 87 हजार रुपये किमतीचे दागिने चोरीला गेले आहेत. शनिवारी (18 मार्च) मीरा रोड परिसरात बागेश्वर धाम सरकार धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा दिव्य दरबार सजला होता. बागेश्वर सरकारचं दर्शन घेण्यासाठी आणि त्यांना ऐकण्यासाठी धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचे लाखो अनुयायी या कार्यक्रमाला पोहोचले होते. शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजता कार्यक्रम सुरू झालेला आणि रात्री 9.30 वाजता कार्यक्रम संपला.
महिलांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, चोरी झालेल्या सोन्याच्या दागिन्यांची एकूण किंमत ४ लाख ८७ हजार इतकी आहे. महिलांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे. मीरा रोडवर धीरेंद्र शास्त्रींच्या २ दिवसांच्या दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे. यावरून राजकीय वातावरणही तापलं आहे.मीरा रोड येथे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा दोन दिवसीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. 18 आणि 19 मार्च दोन दिवस धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
