नागपूर : ओटीटी प्लॅटफॉर्मवर वाढती अश्लीलता आणि असभ्य शिवीगाळ याबद्दल आलेल्या तक्रारींची सरकारने गंभीर दखल घेतली आहे, अशी माहिती, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
सर्जनशीलतेच्या नावाखाली जर कोणी शिवीगाळ करत असेल तर ते सहन केले जाणार नाही. ओटीटी प्लॅटफॉर्मवर वाढती शिवीगाळ आणि अश्लील दृश्याविषयी येणाऱ्या तक्रारींबद्दल सरकार गंभीर आहे. जर यासाठी नियमात काही बदल करण्याची गरज भासली तर मंत्रालय त्या दिशेनेही विचार करेल. कारण या प्लॅटफॉर्मना सर्जनशीलते साठी स्वातंत्र्य देण्यात आले होते, शिवीगाळ आणि अश्लीलतेसाठी नाही. आणि जर कोणी ही मर्यादा ओलांडली, तर सर्जनशीलतेच्या नावाखाली, असभ्य शिवीगाळ स्वीकारली जाणार नाही. यावर काही कारवाई करण्याची गरज पडली तर सरकार मागे हटणार नाही” असेही अनुराग ठाकूर यावेळी म्हणाले.
