दुसऱ्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा दारूण पराभव केला आहे. 10 विकेट्सने दुसऱ्या वनडेत कांगारूंनी विजय मिळवला आहे. अवघ्या 11 ओव्हर्समध्ये ऑस्ट्रेलियाने विजयाला गवसणी घातली. या विजयासह ऑस्ट्रेलियाने वनडे सिरीजमध्ये 1-1 अशी बरोबरी केली आहे. त्यामुळे तिसरी वनडे महत्त्वाची आणि निर्णायक ठरणार आहे.
टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 118 धावांचं आव्हान दिलं होतं. ऑस्ट्रेलियाने हे आव्हान अवघ्या 11 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. ऑस्ट्रेलियाच्या ट्रेव्हिस हेड आणि मिचेल मार्श या सलामी जोडीनेच विजय मिळवून दिला. या दोघांनी 121 धावांची नाबाद भागीदारी केली. मिचेल मार्श याने नाबाद 66 आणइ ट्रेव्हिस हेड याने नाबाद 51 धावांची अर्धशतकी भागादारी केली. ऑस्ट्रेलियाने या विजयासह पहिल्या सामन्यातील पराभवाचा वचपा घेतला. तसेच 3 सामन्यांच्या मालिकेत 1-1 बरोबरी साधली.
