पीडित मुलीचा फोटो ट्वीट केल्याप्रकरणी संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल

ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्या अडचणी काही केल्या कमी होताना दिसत नाहीयेत. संजय राऊतांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी पोलीस ठाण्यात संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. एका प्रकरणात संजय राऊत यांनी पीडित मुलीचा फोटो ट्विट केला होता. यामुळे पीडित मुलीची ओळख समोर आल्यानं गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. गुन्हा दाखल झाल्यानं राऊत यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टॅग करुन देवेंद्रजी… हे चित्र बार्शीतले आहे.. मुलगी तुमच्या कुटुंबातील नाही म्हणून तिचे रक्त वाया जाऊ देऊ नका. भाजपा पुरस्कृत गुंडांनी हा जीवघेणा हल्ला केला आहे.भाजपा पुरस्कृत गुंडांनी हा जीवघेणा हल्ला केला आहे. अल्पवयीन मुलगी पारधी समाजाची आहे.गरिबांच्या मुली रस्त्यावर पडल्या आहेत ?५ मार्चला हल्ला झाला आरोपी मोकाट आहेत.

या ट्विटला काही नेटीझन्सनी तेथेच उत्तर देत मुलींची ओळख हि गुप्त ठेवायची असते. त्यामुळे रिपोर्ट करा सगळ्यांनी असे म्हटलं. दरम्यान आज बार्शी शहर पाेलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनूसार संजय राऊत यांच्या ट्विटवरुन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.मात्र संजय राऊत यांच्यावर कोणत्या कलमातर्गंत गुन्हा दाखल झाला आहे यांची माहिती अद्याप समोर आलेली नाहीये. संजय राऊत यांच्याविरोधात पोक्सो 23, जुवेनाईल जस्टीस 74, आयपीसी 228 अ या कलमांतर्गत गुन्हा दाखल झाल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळत आहे.