स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर

निवडणुकीवरील सुनावणी पुन्हा लांबणीवर गेले आहेत. पुढील सुनावणी 28 मार्चला होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांप्रकरणी सुनावणी पुढच्या मंगळवारी होणार आहे. ऑगस्ट 2022 पासून ही सुनावणी वारंवार पुढे जात आहे. निवडणुकांचा मार्ग कधी मोकळा होणार? याची उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे.

ओबीसी आरक्षण तसेच महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुका या संदर्भात सुप्रीम कोर्टात आज सुनावणी पार पडणार होती. मात्र आता ही सुनावणी २८ मार्च रोजी होणार आहे. महाराष्ट्र सरकारचे वकील तुषार मेहता हे आजच्या सुनावणीवेळी गैरहजर असल्यामुळे सुनावणी पुढे ढकलली गेल्याच म्हटलं जात आहे.23 महानगरपालिका, 207 नगरपालिका, 25 जिल्हा परिषदा, 284 पंचायत समिती अशा सगळ्या निवडणुका घ्यायच्या आहेत. गेल्या दोन तीन वर्षांपासून महाराष्ट्रातल्या या निवडणुका लांबणीवर पडल्यात.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुका याआधी कोरोनामुळे, नंतर ओबीसी राजकीय आरक्षणामुळे आणि आता सत्ताबदलामुळे रखडल्याचं दिसतंय. महत्त्वाचे म्हणजे याच निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्ट मागच्या मे महिन्यात खूप आग्रही होतं.