चांदूरबाजार तालुका खरेदी-विक्री संस्थेच्या निवडणुकीत शिंदे गटासोबत गेलेले आमदार बच्चू कडू यांना मोठा धक्का बसला आहे. १५ संचालकांकरीता १९ मार्च रोजी झालेल्या मतदानानंतर सोमवारी मतमोजणी झाली. सहकार व शेतकरी पॅनलच्या चुरशीच्या लढतीत बबलू देशमुख यांच्या नेतृत्वातील सहकार पॅनलचे १२ संचालक तर शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू यांच्या शेतकरी पॅनलचे तीन संचालक विजयी झाले. काँग्रेस आणि प्रहारने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. या निवडणुकीत शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू यांच्या गृह तालुक्यातील खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत प्रहारचे अवघे तीन उमेदवार निवडून आले. यावेळी जल्लोष करताना विजयी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी नारे बाजी केली.
संस्थेच्या 15 संचालकपदासाठी 19 मार्च रोजी मतदाव घेण्यात आले. त्यानंतर काल सोमवारी मतमोजणी पार पडली. यामध्ये शेतकरी पॅनेल आणि सहकार पॅनेल यांच्यात लढत होती. सहकार पॅनेलने 12 जागा पटकावल्या तर आमदार कडू यांच्या शेतकरी पॅनेलचे फक्त 3 संचालक विजयी झाले.सुरुवातीपासूनच अटीतटीच्या लढतीत अखेर तालुका खविसवर बबलू देशमुख, सुरेखा ठाकरे, प्रमोद कोरडे, यांचे सहकार पॅनलने प्रहारचा धुव्वा उडवून सहकार पॅनलने आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. या निवडणुकीत विविध मतदान केंद्रावर प्रहार व सहकार पॅनलच्या उमेदवारांमध्ये अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळाली.
