केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आल्याची माहिती समोर आली होती. त्यांच्या नागपूरमधील जनसंपर्क कार्यालयात सकाळी धमकीचे तीन फोन आल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर पोलिसांनी कार्यालय आणि त्यांच्या निवासस्थानी सुरक्षा व्यवस्था वाढवून फोन करणाऱ्याचा तपास सुरु केला आहे.
मंगळवारी सकाळी दोन वेळा गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात फोन आले. यातील धक्कादायक बाब म्हणजे गेल्यावेळी १४ जानेवारीला ज्याच्या नावे बेळगावच्या तुरुंगातून धमकीचे फोन केले होते. त्याच जयेश कांथा ऊर्फ जयेश पुजारी नामक व्यक्तीच्या नावे आज पुन्हा धमकीचे फोन आले.या कॉलवरून गडकरींकडे १० कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली अशी माहिती आहे. नितीन गडकरी यांच्या कार्यालयाने नागपूर पोलीसांना याबाबात माहिती दिली आहे. यानंतर पोलिसांनी गडकरींच्या सुरक्षेत वाढ केली आहे.
दरम्यान, नागपूर पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी गडकरी यांच्या कार्यालयात दाखल झाले आहेत. या धमकीची वास्तविकता ते तपासत आहेत. हा केवळ खोडसरपणा की गंभीर बाब आहे याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. यापूर्वी देखील 14 जानेवारी रोजी बेळगाव तुरुंगातून गडकरी यांना कॅाल आले होते, त्याच जयेश पुजारीच्या नावाने पुन्हा गडकरींना धमकी देण्यात आली आहे.
