काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या वक्तव्यावरुन निर्माण झालेल्या वादावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधीमंडळात निवेदन दिलं. तुम्ही जर आमच्या पंतप्रधानांचा अपमान करणार असाल, तर या देशातील जनता आणि आम्ही सहन तो सहन करणार नसल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. सदनाचा मान सन्मान सर्वांनीच राखला पाहिजे. बोलताना सर्वांनी तारतम्य बाळगलं पाहिजे असेही मुख्यमंत्री म्हणाले.
सभागृहाच्या बाहेर जे काही झालं त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी आहे. काल विषय झाला होता. पण पंतप्रधानांचा अपमान करणं हा संपूर्ण देशाचा अपमान आहे. तसंच गेल्या आठ महिन्यांपासून माझे फोटो लावून अपमान करणं, खोके, चोर, मिंधे म्हणणं हे कोणत्या आचारसंहित बसतं. आम्ही जोडे मारण्याचं समर्थन केलेलं नाही. सावकरांचा वारंवार अपमान करणं हादेखील देशद्रोहच आहे. त्यामुळे आपण जेव्हा दुसऱ्याकडे बोट दाखवतो तेव्हा तीन बोटं आपल्याकडे असतात. या सभागृहाचं पावित्र्य जपा अशी माझी विनंती आहे, असं एकनाथ शिंदे काँग्रेस नेते नाना पटोले यांना उद्देशून म्हणाले.
काल राहुल गांधी यांच्या फोटोला जोडे मारले, त्याचे आम्ही समर्थन केलं नाही. पण स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल असं बोलणं देशद्रोह असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल बोलणं योग्य नाही. या देशाचा मान आणि देशाची कीर्ती पोहोचवण्याच काम प्रधानमंत्र्यांनी केल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
