शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात महाविकास आघाडीतील तिन्ही घटक पक्षांनी राज्यभरात एकत्रित सभा घेण्याची घोषणा केली आहे. 2 एप्रिलला छत्रपती संभाजीनगरमधून या सभेला सुरवात होणार आहे. मात्र महाविकास आघाडीच्या याच सभांना उत्तर देण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मैदानात उतरणार आहे. कारण छत्रपती संभाजीनगरमध्ये 2 एप्रिलला होणाऱ्या महाविकास आघाडीच्या सभेनंतर मुख्यमंत्री शिंदे राज्यभरात ‘धनुष्यबाण यात्रा’ काढणार आहे. विशेष म्हणजे त्यांच्या ‘धनुष्यबाण यात्रे’ची सुरवात देखील छत्रपती संभाजीनगर मधूनच होणार आहे. आठ किंवा नऊ एप्रिलला छत्रपती संभाजीनगरमधून मुख्यमंत्री शिंदे यांच्या धनुष्यबाण यात्रेला सुरवात होणार आहे.