शेतकऱ्यांसाठी महावितरणकडून ऑफर; 70 टक्के थकबाकी भरल्यास 30 टक्के माफ

मार्च महिन्याच्या शेवटी थकबाकी वसुली करण्यासाठी वेगवेगळ्या विभागाकडून वसुली मोहीम राबवल्या जातात. दरम्यान महावितरणकडून देखील अशीच काही योजना शेतकऱ्यांसाठी जाहीर करण्यात आली आहे. 31 मार्चपर्यंत शेतकऱ्यांनी कृषी पंपाची 70 टक्के थकबाकी भरल्यास 30 टक्के रक्कम माफ होणार आहे. यानुसार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 1 लाख 376 शेतकऱ्यांनी 73 कोटी 9 लाख रुपये भरले आहेत. तर 31 मार्चपर्यंत ही योजना लागू राहणार आहे.

डिसेंबर 2022 अखेरपर्यंत महावितरण पुणे प्रादेशिक विभागात कृषिपंप वीज ग्राहकांची थकबाकी 12 हजार 61 कोटी झाली आहे. जानेवारी 2021 ते मार्च 2022 पर्यंत यावर 50 टक्के सूट देण्यात आली होती. एप्रिल 2022 ते 31 मार्च 2023 पर्यंत या योजनेवर 30 टक्के सूट देण्यात येणार आहे. विलंब आकार व व्याज पूर्णतः माफ करण्यात येत आहे. यामुळे शेतकऱ्यांना यामध्ये दिलासा देण्याचा महावितरणचा प्रयत्न आहे.

मागील वर्षाच्या सरतीशेवटी म्हणजेच डिसेंबर 2022 अखेरपर्यंत महावितरण पुणे प्रादेशिक विभागात कृषीपंप विज ग्राहकांची एकूण थकबाकी जवळपास 12 हजार 61 कोटी इतकी होती.ही थकबाकी कमी करण्याच्या हेतूने महावितरणमार्फत जानेवारी 2021 ते मार्च 2022 पर्यंत वीज बिलामध्ये 50% टक्के सूट देण्यात आली होती.शेतकऱ्यांना एप्रिल 2022 ते 31 मार्च 2023 या कालावधीमध्येच आपला थकित बिलाचा वीज भरणा करून घ्यायचा आहे. या कालावधीमध्ये भरणा करण्यात आलेल्या ग्राहकांनाच वीज बिलामध्ये 30 टक्के सूट देण्यात येणार आहे.तसेच विलंब आकार व व्याज पूर्णता: माफ करण्यात येईल. महावितरणच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना नक्कीच काही प्रमाणात विजबिलामध्ये सवलत मिळेल.