मिंधा आहेस तू, पहिले आम्ही दिलेले मत परत कर; गुलाबराव पाटील यांचा संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल

मिंधा आहेस तू, पहिले आम्ही दिलेले मत परत कर, नाहीतर तेच कांदे तोंडावर हाणून मारेल, असा हल्लाबोल गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर केला.

शेतकऱ्यांना भाव न देणारे कांदे व गुलाबराव पाटील यांना फेकून देण्याची वेळ आल्याची टीका संजय राऊत यांनी मालेगाव येथील सभेत केली होती. या टीकेवर उत्तर देताना गुलाबराव पाटील म्हणाले, संजय राऊत यांना माझ्यावर टीका करावी लागते म्हणजे मी छोटा माणूस नाही. लोक त्याच झाडाला दगड मारतात ज्याला फळे असतात. तूच मिंधा आहेस. पहिले आम्ही दिलेले मत परत कर. नाहीतर तेच कांदे तोंडावर हाणून मारेल.