बीसीसीआयच्या वार्षिक करारात जडेजाला लॉटरी; 7 खेळाडू बाहेर तर 6 जणांना संधी

बीसीसीआयने 2022-23 साठी वार्षिक करार केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. बीसीसीआयने चार कॅटेगरीमध्ये 26 खेळाडूंना निवडले आहे. ए प्लस, ए, बी, आणि सी अशा चार कॅटेगरीमध्ये खेळाडूंना निवडले आहे. करारानुसार, बीसीसीआयकडून प्रत्येक खेळाडूला वार्षिक पैसे दिले जातात. नव्या करारात ए प्लसमध्ये ४, ए कॅटेगरीत ५, बी कॅटेगरीत ६ आणि सी कॅटेगरीत ११ खेळाडुंचा समावेश आहे. हा करार ऑक्टोब २०२२ ते सप्टेंबर २०२३ पर्यंत असेल. यात ए प्लस खेळाडुंना ७ कोटी रुपये, ए कॅटेगरीतील खेळाडूंना ५ कोटी रुपये, बी कॅटेगरीसाठी ३ तर सी कॅटेगरीतील खेळाडूंना प्रत्येकी १ कोटी रुपये मिळतील.

बीसीसीआयने वार्षिक करारात अष्टपैलू क्रिकेटर जडेजाला ए प्लस कॅटेगरीत प्रमोट केलंय. गेल्या वर्षीपर्यंत जडेजा ए कॅटेगरीत होता. आता तो रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह यांच्या पंक्तीत बसला आहे. अष्टपैलू क्रिकेटर हार्दिक पांड्याला मोठी लॉटरी लागली असून तो सी ग्रेडमधून थेट ए ग्रेडमध्ये पोहोचला आहे. तर अक्षर पटेलसुद्धा बी कॅटेगरीमधून ए कॅटेगरीत पोहोचला आहे. टी२० क्रिकेटमध्ये आपल्या कामगिरीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलेल्या सूर्यकुमार यादवला प्रमोट करण्यात आलंय. तो सी कॅटेगरीतून बी कॅटेगरीत पोहोचलाय.

बीसीसीआय खेळाडूच्या कामगिरीचं मूल्यमापन करुन संबंधित खेळाडूचा योग्यतेनुसार त्या त्या गटात श्रेणीत समावेश केला जातो. तसेच श्रेणीनुसार वार्षिक वेतन ठरतं. बीसीसीआय A+ श्रेणीतील खेळाडूला 7 कोटी, A+ श्रेणीतील खेळाडूला 5 कोटी, B श्रेणीतील खेळाडूला 3 आणि C श्रेणीतील खेळाडूला 1 कोटी देतं. यंदाही या क्रमानेचस ही रक्कम ठरवण्यात आली आहे. ही वार्षिक पगारवाढ ऑक्टोबर 2022 ते सप्टेंबर 2023 पर्यंत असणार आहे. थोडक्यात काय तर टीम इंडियाच्या खेळाडूंना ही वाढ ऑक्टोबर 2022 लागू होणार आहे.