उद्धव ठाकरेंची नार्को टेस्ट करा; म्हणजे कुठल्या कंपनीकडून किती पैसे घेतलेत हे समजेल – सुहास कांदे

उद्धव ठाकरे यांची नार्कोटेस्ट करा म्हणजे कुठल्या कंपनीकडून किती पैसे घेतले हे कळेल, असा घणाघाती आरोप शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी केला आहे. उद्धव ठाकरेंनी जनतेसाठी नाही, तर श्रीधर पाटणकर यांची चौकशी होऊ नये म्हणून राजीनामा दिला, असा खळबळजनक दावा देखील सुहास कांदे यांनी केला आहे. हे सगळं सत्य बाहेर यावं म्हणूनच उद्धव ठाकरे यांची नार्को टेस्ट करणं गरजेचं आहे, असंही कांदे म्हणाले आहेत.

उद्धव ठाकरेंनी केलेल्या ५० खोक्यांच्या आरोपावर सुहास कांदे म्हणाले, उद्धव ठाकरेंना माझी विनंती आहे की, आपण आता भावनेचे राजकारण बंद करावे मी उद्धव ठाकरेंना जाहीर आव्हान करतो की, आम्ही खोका सोडा एक रुपया घेतला असेल तर आमची नार्को टेस्ट करा ती सुद्धा जाहीरपणे कॅमेरे लावून टेस्ट करा. ज्यांनी बाळासाहेबांना शिव्या दिल्यात, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न केला, त्याच भुजबळांच्या मांडीला मांडी लावून उद्धव ठाकरे बसले. मग आम्ही कोणाकडे पाहायचे? असा संतप्त सवाल यावेळी सुहास कांदे यांनी उद्धव ठाकरेंना केला आहे.