काँग्रेसची ‘भारत जोडो यात्रा’ महाराष्ट्रात असताना काँग्रेसचे खासदार राहुल गांधी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर वादग्रस्त टिप्पणी केली. या टिप्पणीनंतर राज्यभरात संताप व्यक्त केला गेला. भाजपा, मनसे तसेच इतर पक्षांनी राहुल गांधींविरोधात आंदोलन केले. दरम्यान, राहुल गांधी यांच्या याच टीकेवर भाजपाच्या खासदार पूनम महाजन यांनी भाष्य केले आहे. राहुल गांधी यांचे नाव गांधी नव्हे तर ‘राहुल गंदगी’ असे हवे होते, अशी टीका पूनम महाजन यांनी केली. त्या एका सभेला संबोधित करत होत्या.
भाजपच्या खासदारांनी दिल्लीत संसद भवन परिसरात राहुल गांधींविरोधात निषेध आंदोलन केलं. यामध्ये भाजपच्या मराठी खासदारांनीही सहभाग नोंदवला. यामध्ये पूनम महाजन, धनजंय महाडीक हे देखील सहभागी झाले होते. यावेळी महाजन म्हणाल्या, “राहुल गांधी यांनी सावकरांबाबत बोलताना म्हटलं होतं की, ते सावरकर नाहीत.
पूमन महाजन यांनी उद्धव ठाकरे गटावरदेखील टीका केली. “जे आम्ही हिंदूत्ववादी आहोत असे म्हणतात तेदेखील शांत बसलेले आहेत. हीच तुमची विचारधारा आहे का? आम्ही देशहितासाठी पीडीपीला धुडकावून लावलं. आता शिवसेना आपल्या विचारधारेसाठी काँग्रेसला धुडकावून लावणार का?” असा सवाल पूनम महाजन यांनी केला आहे.
