निवडणूक प्रतिज्ञापत्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी माहिती लपविल्याचा आरोप करुणा मुंडे यांनी केला आहे. त्यांच्याविरुद्ध कौटुंबिक हिंसाचाराची याचिका दाखल केली आहे.राज्य महिला आयोगाच्या रुपाली चाकणकर यांची मदत झाली नाही, असे त्यांनी सांगितले.
मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत करुणा मुंडे म्हणाल्या न्यायालयाच्या आदेशामुळे मी आजपर्यंत गप्प होते. कोर्टात दिलेल्या प्रतिज्ञापत्रात देखील धनंजय मुंडे यांनी खोटी माहिती दिली आहे. धनंजय मुंडे यांचे नाव मी सगळ्या कागदपत्रात लावते. 1998 मध्ये आम्ही एकत्र आलो असुन 2004 पासून लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहतो.असे धनंजय मुंडे यांनी सांगितले होते. परंतु ते खोटं आहे. 1996 पासुन आम्ही सोबत आहोत. माझ्या 1 कोटी रुपयांच्या पॉलिसीमध्ये देखील धनंजय मुंडे हे वारसदार आहेत. माझ्या पासपोर्टमध्ये धनंजय मुंडे यांचं नाव आहे. माझ्या मुलांच्या बर्थ सर्टिफिकेट आणि आधार कार्ड वर देखील धनंजय मुंडे यांचं नाव आहे. धनंजय मुंडे यांच्या स्वतःच्या २ कोटी रुपयांच्या पॉलिसीवर देखील माझं नाव बायको म्हणून आहे. मी नॉमिनी आहे.आमच्या दोघांचं जॉइंट अकाउंट देखील आहे. त्याची कागदपत्रे पत्रकार परिषदेत सादर केलेली आहे. पॅन कार्ड तसेच निवडणूक ओळख पत्र तसेच इतर अनेक कागदपत्रांवर माझं नाव करुणा धनंजय मुंडे असेच आहे. मी घटस्फोट देणार नाही. कायद्यानुसार मी कोट्यावधीची मालकीण आहे माझं कौन्सिलिंग देखील करण्यात आले होते जेणेकरून मी त्याला सोडून द्यावं.
करुणा मुंडे म्हणाल्या, एक असा माणूस विधानभवनात बसणे हे दुर्दैवी आहे. विधिमंडळातील कोणीही आवाज उठवत नाही.धनंजय मुंडे यांना पक्षातून काढून टाकण्याची मागणी केली आहे.शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांना धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. चार पत्रकार परिषदा घेऊन पोल खोल करणार आहे. पोलीस आणि प्रशासन माझा छळ करत आहेत. धनंजय मुंडे यांच्याविरोधात कौटुंबिक हिंसाचाराची याचिका दाखल केली आहे.सोशल मीडियावर मला घाणेरड्याप्रकारे शिवी गाळ केली जाते माझा शिवशक्ती पक्ष बीडमध्ये सगळ्या जागा लढवणार. तसेच राज्यभर देखील निवडणुका लढवणार आहे, असे त्यांनी सांगितले.
